जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रुख्मिणी फाउंडेशन मिडटाऊनचा पदग्रहण स्नेह मिलन, सायकल व शिलाई मशीन वाटप कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी भावेश वाणी, सुरज चव्हाण, स्वरा धर्माधिकारी, उज्वल जैन यांना सायकल तर प्रिया चव्हाण यांना शिलाई मशीन भेट देण्यात आले. याचे आर्थिक सहकार्य उद्योजक आशुतोष सेठी यांनी केले. यावेळी नवीन कार्यकारणींनी पदभार स्वीकारला. अध्यक्ष राजीव श्रॉफ आणि सचिव निलेश नागला यांनी पदभार स्वीकारला.
यावेळी प्रमुख अतिथी आमदार राजूमामा भोळे, सीए जगदीश अग्रवाल, उज्वलाताई बेंडाळे, जितेद्र लाठी, नितीन बोरकर (वन परिक्षक) यांच्या उपस्थित होते. सूत्रसंचालन सीमा गाजरे ,स्पप्ना श्रॉफ, आभार पंकज जैन प्रस्तावना जगदीश अग्रवाल यांनी केली. माजी अध्यक्ष अनिल चोरडिया यांनी वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा दिला, त्यांना मानपत्र आमदार राजुमामा भोळे हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले.
या प्रसंगी झालेल्या विविध खेळात मुलांमध्ये रिद्धीका फुसेकर,सेजल कोठारी,पुरव नागला,सभासदां मध्ये कपल्समध्ये निलेश नागला व प्रिया साखंला, कल्पक साखंला व लक्ष्मी साखंल सिंगल मध्ये प्रदिप सराफ, निरज साखंला यांना गिफ्ट देण्यात आले. यावेळी पंकज जैन, भुषण जगताप, रवि राजपुत, अल्पेश कोठारी, राजेश भंडारी, शितल जैन, उदय कर्नावट, कमलेश डांबरे, गणेश फुसेकर, अजय शर्मा, सीए नचीकेत जाखेटीया,अँड शैलेश नागला, प्रदिप सराफ,कल्पक साखलां, डॉ विजय साखंला, डॉ अमीत वर्मा, किर्तीकांत चौबे सिमा गाजरे इ सभासद उपस्थित होते.