जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा आणि संशोधन केंद्राच्या हिंदी विभाग व बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यामाने सोमवार १० रोजी विश्वभाषा हिंदी दिनाचे औचित्य साधुन ‘बँक ऑफ बडोदा मेधावी छात्र पुरस्कार’ वितरणाचा समारंभ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, भाषा अभ्यास प्रशाळेच्या संचालक प्रा.मुक्ता महाजन, हिंदी विभाग प्रमुख सुनील कुलकर्णी, बँक ऑफ बडोदा राजभाषा अधिकारी सुकन्यादेवी हे उपस्थित होते. हिंदी विभागातून प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या एका विद्यार्थ्यांला व एका विद्यार्थीनिस दर वर्षी बँक ऑफ बडोदा मेधावी छात्र सम्मान देण्यात येतो. या वर्षीचा प्रथम पुरस्कार कु.स्नेहा गायकवाड तर द्वितीय पुरस्कार योगेश पावरा यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. दुपारी ‘वैश्विक परिप्रेक्ष्य में विश्व भाषा हिंदी की प्रासंगिकता’ या विषयावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपुरचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.मनोज पाण्डेय यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले. अशी माहिती प्रशाळेच्या संचालक प्रा.मुक्ता महाजन, हिंदी विभाग प्रमुख डॉ.सुनील कुलकर्णी यांनी दिली.