धरणगाव (प्रतिनिधी) स्वतंत्र दिवसाचे औचित्य साधून शहरातील मान्यवरांनी महात्मा फुले हायस्कूलमधील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.
यावेळी उपस्थित दानशूर व्यक्तिमत्त्व शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ यांच्याकडून २१, पनवेल येथील उपअभियंता दिलीप शिवराम सोनवणे यांच्याकडून २०, मोठा माळीवाडा सावता माळी समाज सुधारणा पंच मंडळकडून २१, माजी आमदार हरीभाऊ महाजन यांच्याकडून ११, तर माजी लिपिक आर.बी. पाटील यांच्याकडून २ गणवेश देण्यात आले. याच मान्यवरांच्या हस्ते विध्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी वरील सर्व दानशुर व्यक्तींचे महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आभार मानले.