शिरसाळा येथे घरकुल योजनेत घोळ; लाभार्थ्यांची तक्रार

बोदवड लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील गरजू लाभार्थ्यांना या योजनेचा पैसा मिळाला नाही तर काही वर्षांपुर्वी बांधलेल्या घरांचे फोटो टाकून धनादेश काढण्यात आले आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

बोदवड पंचायत समितीच्या अंतर्गत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत विचार करत मागणी केली आहे. घरकुल घोटाळ्या संदर्भात गटविकास अधिकारी यांना बोदवड तालुक्यात घरकुल योजनेचा घोळ झाल्याचे निदर्शनास आणून दिले. जळगाव महानगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्याला लाजवेल असा घरकुल घोटाळा बोदवड तालुक्यात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे जिवंत उदाहरण म्हणजे शिरसाळा येथे गरजू, पात्र, वंचित लाभार्थींना डावलून पक्के घरा असलेले काही वर्षांपूर्वी बांधलेल्या घरांचे फोटो टाकून चेक काढले दिसत आहे. शिरसाळा मारुती येथे घरकुल योजनेसाठी ९० लाभार्थ्यांनी घरांचे मागणी केली होती. ग्रामसेवक यांनी पंचायत समितीला ९० लोकांचे प्रस्ताव पाठवले, त्यापैकी ६३ लाभार्थींचे घरकुल मंजूर करण्यात आले. या यादीतील ज्यांचे घर मातीचे आहे ,कच्चे आहे, कुडाचे अशा लाभार्थीच्या खात्यावर आजपर्यंत एक रुपया सुद्धा पैसा जमा केले नाही. बऱ्याच लाभार्थ्यांनी चेक काढले पण अजून घराचे बांधकाम केले नाही त्यांच्या खात्यावर दुसरा हप्ता ४५ हजार रुपये जमा केल्याचे दिसून येते.

घरकुल मंजुरीसाठी ५ हजार रुपये तर पहिल्या हप्ता जमा करण्यासाठी १ हजार रुपये असे पैसे दलाल घेत आहेत, असे वंचित लाभार्थ्याकडून बोलले जाते. त्याचप्रमाणे मानमोडी येथ ग्रामसभेचा ठराव न घेता घरकुल मंजूर झाले कसे ? घरकुलाचे पैसे जमा करण्याच्या नावाखाली ११ हजार रुपये लाच घेऊ नये, अद्याप त्याच्या खात्यावर त्याचे पैसे जमा केलेले नाही. हे पैसे लाभार्थीने व्याजानेकाढून दिले आहे. गृहनिर्माण अभियंता अजून २ हजार रुपये मागणीसाठी लाभार्थ्याच्या घरी मागण्यासाठी आला होता असे लाभार्थी चागो विठोबा पाटील यांनी सभेत बोलताना सांगितले. एकंदरीत या घरकुल घोटाळ्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, याचा शोध गटविकास अधिकारी याचा शोध घेतील का ? आणि ज्या लाभार्थींच्या अद्याप पहिला हप्ता जमा केला नाही. त्या खात्यावर लवकर पैसे जमा होतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Protected Content