मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्रतेच्या नोटीसा पाठविल्या असून यात चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे यांचादेखील समावेश आहे.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आधीच शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावल्याची माहिती समोर आली होती. शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. झिरवाळ यांनी आमदारांना नोटीसा दिल्या असून आमदारांना सोमवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत यावर खुलासा सादर करण्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
नरहरी झिरवाळ यांनी पहिल्या टप्यात १६ आमदारांना अपात्रतेच्या नोटीसा पाठविल्या आहेत. यात चोपडा येथील आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचा देखील समावेश असल्याची माहिती आली आहे. अर्थात, या १६ आमदारांसमोर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.