महिलांना काम करताना होणाऱ्या लैगिंक समस्यांवर चर्चा सत्र

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ५ जानेवारी रोजी जळगाव येथे हॉटेल सिल्वर पॅलेस  येथे महिलांना येणाऱ्या समस्या आणि कायदेशिर चौकट या विषयावर एक दिवशीय चर्चा सत्राचे आयोजन नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर, संग्राम संस्था सांगली, व स्वाधार महिला संघ, अमळनेर आणि आधार बहुउद्देशिय संस्था अमळनेर आणि विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सदर चर्चा सत्राचा मुख्य उद्देश १९ मे रोजी भारताच्या मा. सर्वोच्य न्यायालयाने लैंगिक कामगारांच्या अधिकारांच्या बाबतित निर्देश जारी केले आहेत. सर्व सेक्स वर्कर्सना संविधानानुसार सन्मानाचे जीवन कसे जगता येइल या विषयी सुप्रीम कोर्ट पॅनलने  न्यायालयाला तपशिलवार शिफारसी केल्या आहेत.

सदर चर्चासत्राच्या कार्यक्रमात विधिसेवा प्राधिकरणचे जळगाव जिल्हयातील वकील प्रतिनिधी, जळगाव शहरातील पोलिस अधिकारी, सेक्स वर्कर सोबत कार्य करणाऱ्या विविध सामाजीक संस्थेचे प्रतिनिधि, महिला व बालकल्याण विभागाचे प्रतिनिधी व  लैंगिक कामगार प्रतिनिधी आणि जिल्हा एडस नियंत्रण कार्यालयाचे प्रतिनिधी, मीडिया प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या चर्चा सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणुन विधि सेवा प्राधिकरण जळगाव, यांचे सचिव मा. सय्यद सर उपस्थित होते. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड ललिता ताई पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला उद्घाटन सत्रामध्ये  मान्यवरच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सेक्स वर्कर्स महिलांच्या समस्येवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आधार बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचा उद्देश, आधार आणि स्वाधार संघ यांचे सेक्स वर्कर महिलांसाठीचे मागील २५ वर्षातील केलेल्या कामाची ओळख करून दिली. यानंतर प्रमुख मार्गदर्शक अँड. ललिताताई पाटील यांनी सेक्स वर्कस महिलांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन यावर प्रकाश टाकला.

तसेच १९ मे रोजी सर्वाच्या – न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना या बाबतित सविस्तर  मांडणी केली. त्यानंतर पोलिस प्रतिनिधी म्हणुन आवतारे मॅडम, पोलिस निरीक्षक व एस पी पाटील मॅडम  (उपनिरीक्षक) यांनी आपली भूमिका माडली. मा. सय्यद सर (सचिव विधि सेवा प्राधिकरण) जळगाव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगता मध्ये विधी सेवा मार्फत सुरु असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली  व सेक्स वर्कर महिला च्या बाबतीत असलेल्या कायदयांची अंमलबजावणी करत असतांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनाचे पालन कसे करावे, व  महिलांनी जास्तीत जास्त उद्योग व्यवसाय प्रशिक्षण घेऊन सक्षम व्हावे असे आवाहन केले.

सदर चर्चा सत्रामध्ये सुमारे ८० प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमात आलेल्या महिला यांच्या वतीने फरिदा काझी व रीनादिदी यांनी त्यांच्या सोबत घडलेले प्रसंग सांगितले.  त्यानंतर चर्चासत्र सर्वांना खुले केले गेले. यामध्ये खालील प्रतिनिधीनीं आपल्या भूमिका चर्चासत्रात सहभागी होऊन मांडल्या.

1) अँड. जे. जे. खान 2) अँड मंजुला मुंदडा, 3) अँड अभिजित मेने 4) संजय धनघट  (संग्राम प्रतिनिधी) 5 )आशा सोनार (गोदावरी फाउंडेशन) 6) विजय वाघमारे (मिडिया प्रतिनिधी 7)भारती कुमावत (मनोधैर्य समिती) 8) संजय पहुरकर ( कार्यक्रम अधिकारी DAPCU) 9) अँड स्वाती निकम 10) प्रा. विजय कुमार वाघमारे (समाजकार्य महाविद्यालय. अमळनेर) इ. मान्यवरांनी चर्चासत्रात आपले मते व दृष्टिक्षेप टाकून सकारात्मक चर्चा घडवुन आणली .

सदर चर्चा सत्राला यशस्वी करण्याकरिता  आधार बहुउद्देशिय संस्था, स्वाधार महिला संघ, संग्राम संस्थेच्या  सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. प्रा. विजय कुमार वाघमारे यांनी आधार संस्था राबवित असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती देऊन, भारतातील सेक्स वर्कर महिलांची सामाजीक परिस्थिती यावर सविस्तर विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिपक संदानशिव यांनी केले व आभार प्रदर्शन रेणु प्रसाद मॅडम यांनी केले.

Protected Content