रावेरात मराठा समाजाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा समाजाचा आगामी वधू-वर परिचय मेळाव्याच नियोजन करण्याच्या उद्देशाने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत समाजाच्या प्रगतिविषयक विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. लग्न व हळदीसारख्या कार्यक्रमांचे वेळेवर आयोजन व्हावे, यासाठी ठराव पारित करण्यात आला. समाजातील मुला-मुलींच्या शैक्षणिक स्तरात असलेली दरी भरून काढण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

प्रा.उमाकांत महाजन यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलांच्या शैक्षणिक जबाबदारीचे दायित्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला. “मुलीप्रमाणे मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी समाजाने पुढे यायला हवे,” असे महाजन म्हणाले.समाजातील शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील अशा विषयांवर विचारमंथन करण्यात येणार आहे. शेवटी त्यांनी सांगितले.

बैठकीला उपस्थित मराठा समाज बांधवांनी घेतलेल्या निर्णयांचे स्वागत केले. या वेळी मुकेश पाटील, विजय महाजन, ज्ञानेश्वर महाजन, गंगाराम दाणी, मधुकर महाजन, पंडीत महाजन, राजेश दिवेकर, देविदास महाजन, रमेश पाटील, दीपक पाटील, प्रभाकर महाजन, मिलिंद महाजन, नितीन महाजन, मधुकर शिंदे, प्रकाश दिवेकर, विनोद मराठे यांच्यासह सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजातील अनेक सदस्यांची उपस्थिती होती. ही बैठक समाजातील एकोप्याचे प्रतीक ठरली असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले हे प्रयत्न नक्कीच फलदायी ठरतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Protected Content