गारबर्डी धरणावर आपत्ती व्यवस्थापनाचे तहसीलदारांच्या उपस्थितीत प्रशिक्षण

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गारबर्डी धरणावर आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी बोटीद्वारे सुकी नदीत प्रत्यक्ष आपत्ती निवारणाचा अनुभव अधिकाऱ्यांनी घेतला.

महसूल पंधरवड्यानिमित्त आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव पथकाच्या वतीने गारबर्डी धरणावर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी रावळ, तसेच तहसीलदार बंडु कापसे, अप्पर तहसीलदार मयुर कळसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, होमगार्ड अधिकारी संजय तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोचरे, आपदा मित्र पथक, होमगार्ड अधिकारी व कर्मचारी, तहसील कार्यालयातील प्रवीण पाटील तसेच तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल आणि इतर नागरिक उपस्थित होते.

महसूल पंधरवड्याच्या निमित्ताने तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींची निवड करून अंत्योदय कार्ड वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना तहसीलदार बंडु कापसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमात नायब तहसीलदार साळी, पुरवठा निरीक्षक डी. के. पाटील, तसेच संजय गांधी निराधार योजनेचे योगेश मोहिते व सुषमा घरडे उपस्थित होते.

Protected Content