भुसावळ प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या दीपनगर येथे महाजनकोच्या मध्यमातून कामगार व आधिकारी यांच्या मुलांकरीता दीपनगर ते भुसावळ स्कूल बस वार्षिक कराराने बस भाड्याने ठेका देण्यात आलेला आहे. शनिवारी विद्यार्थ्यांना सोडून परतत असताना दुपारी 1 वाजता बसचे दोन चाक अचानक निघून पडल्याने अपघात टळला.
दीपनगर ते भुसावळ स्कूल बस वार्षिक कराराने बस भाड्याने ठेका देण्यात आला असून याच बसेस मधून गेली दहा-बारा वर्षापासून एकाच ठेकदारला सदरचा ठेका मिळत आहे. त्यात ही बसच्या फेरी सुध्दा संशयास्पद आहे. जवळपास नऊ बसेस सुरु आहेत. बऱ्याच बसेस ह्या खुप जुन्या झाल्या आहेत. याचा परिणाम शनिवारी दुपारी 1:00 वाजता दिसून आला चालू बसची मागिल क्लिनर बाजूचे दोन्ही चाके अचानक निघुन गेली. सुदैवाने नुकतेच बस मुलाना सोडून दीपनगरला शक्तिगड कार्यालयात जात असताना हा प्रकार घडला. याबाबत बसचालकाकडून याविषयी आधिक चौकशी केली असता बसेस खुप जुन्या झालेल्या आहेत. आताच मालकाने हिंगोली येथून बसची सव्हिसिंग करुन आणले आहे. परंतु बस जुन्या झाल्याने अशा प्रकारचे अपघात नेहमी होत असतात. याकडे महाजनको प्रशासने लक्ष देण्याची गरज आहे. एखादी अप्रिय घटना घडण्या अगोदर या विषयी ठेकदारास समज देऊन कारवाई करणे गरजेचे आहे.