चोपडा (प्रतिनिधी) जिल्हा मार्केटिंग कॉ- ऑप सोसायटीचे माजी चेअरमन आणि चोपडा साखर कारखानाचे माजी संचालक तसेच प्रसिद्ध विधितज्ञ अॅड उज्वल निकम यांचे जेष्ठ बंधू दिलीपराव देवराव निकम यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी आज (दि.३) रोजी पहाटे दुःखद निधन झाले.
भाईंसाहेब दिलीपराव निकम यांचे आज पहाटे साडेपाच वाजता निधन झाले. भाईंसाहेब हे मितभाषी, शांतस्वभावी, दिलखुलास , मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व असणारे होते. त्यांनी बी.ए. सी.अॅग्रीपर्यंत शिक्षण घेऊन माचाला येथे शेती व्यवसाय सुरू केला. उत्कृष्ट शेतीकरी म्हणून त्यांचे चोपडा तालुक्यात नावलौकिक होते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी दिलीप सिमेंट पाईप इंडस्ट्रीज सुरू केला होता. शांतस्वभावी असल्याने त्यांनी राजकारणात असूनही कुणाचे उणेंदुणे काढले नाही. राजकारणात टीका टिप्पनी केली नसल्याने त्यांचे सर्व पक्षाच्या लोकांमध्ये सर्वांना हवाहवासा वाटणारा माणूस म्हणून प्रतिमा होती. त्यांच्या पश्चात धर्मपत्नी, दोन बंधू तर दोन बहिणी व दोन मुले, तर दोन मुली असा मोठा परिवार आहे. ते अॅड. उज्वल निकम, प्रवीण निकम यांचे बंधू तर स्टेट मार्केटिंग फेडरेशनचे संचालिका , कृपको (दिल्ली ) च्या संचालिका शैलजाताई निकम यांचे पती. कॉम्प्युटर क्षेत्रात नावलौकिक निर्माण केलेल्या रोहित आणि मितेश निकम यांचे वडील होत.