चाळीसगावात ‘महिलांमध्ये डिजिटल साक्षरता’ कार्यशाळा उत्साहात

chalisagaon 2

 

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील बी.पी.आर्टस्, एस.एम.ए.सायन्स आणि के.के.सी.कॉमर्स कॉलेजमध्ये महाराष्ट्र महिला आयोग मुंबई यांच्या वतीने आज ‘महिलांमध्ये डिजिटल साक्षरता’ विषयक प्रशिक्षण या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सोशल मिडीयाचा वापर म्हणजे डिजीटल साक्षरता नव्हे
स्त्री साक्षरता झालेली असून आता महिलांनी पुढील डिजीटल साक्षरतेकडे जाण्याची गरज आहे. व्हाट्सअप आणि फेसबुक येणे म्हणजे डिजिटल साक्षरता नव्हे, तर तंत्रज्ञानाचा वापर करून घरबसल्या बँकांचे आर्थिक व्यवहार, महिला सुरक्षा अँप, छोटे-मोठे उद्योग सुद्धा आपणास करता आले पाहिजे. तेव्हा खरी डिजिटल साक्षरता महिला होईल, असे प्रतिपादन राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य माजी सदस्या देवयानी ठाकरे यांनी महिलांमध्ये डिजिटल साक्षरता विषयक प्रशिक्षण कार्यशाळेते केले.

एकजुटीने आवाज उठविणे
याप्रसंगी प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर आपल्या मनोगतात सांगितले की, महिलांमध्ये साक्षरता आता झाली आहे. परंतु अजूनही अनेक महिला या अन्यायाविरुद्ध तक्रार देण्यास का घाबरतात, आजसुद्धा समाजामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहेत. त्यांच्याविरुद्ध आपण एकजुटीने आवाज उठविणे गरजेचे आहे. तरच समाजातील गुन्हेगारी मानसिकता कमी होईल. आणि यासाठी आम्ही अशा कार्यशाळेचे आयोजन करीत असतो.

प्राणायामाच्या माध्यमातून शारीरिक क्षमता वाढवणे
कार्यशाळा प्रमुख डॉ.सुनीता कावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शेवटी अध्यक्षीय भाषणात क.मा.राजपूत म्हणाले की, महिलांची कार्यक्षमता ही पुरुषांपेक्षा चार पट जास्त आहे, म्हणून समाजातील विकृती विरुद्ध आपण लढलो पाहिजे, आवाज उठविला पाहिजे. तसेच महिलांनी घरातील कामे करून प्राणायामाच्या माध्यमातून शारीरिक क्षमता अजून वाढविली पाहिजे.

कार्यक्रमावेळी यांची होती उपस्थिती
या कार्यशाळेचे अध्यक्ष चा.ए.सोसायटीचे क्रीडा समिती चेअरमन क.मा.राजपूत होते. उद्धघाटक म्हणून राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य माजी सदस्या देवयानी ठाकरे तर कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील जयश्री पाटील, मार्गदर्शक डॉ.राहुल कुलकर्णी, प्राचार्य डॉ.मिलिंद बिल्दीकर, उपप्राचार्य अजय काटे, कार्यशाळा प्रमुख डॉ.सुनीता कावळे व कार्यालयीन प्रमुख हिलाल पवार व्यासपीठावर उपस्थतीत होते.

यशस्वीतेसाठी परिश्रम
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली पाटील व रवी पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सुनीता जगताप यांनी मानले. यावेळी महिलांनी आपली मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.

Protected Content