चाळीसगाव प्रतिनिधी । येथील शहर वाहतूक शाखेच्या पोलीसांना आज डिजीटल चलनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
आज सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत पोलिस कर्मचारी यांना एक राज्य एक चलन असे वाहतूक करणारे वाहन यांना कश्या दंड डिजिटल पद्धतीने द्यावे या अनुषंगाने अविनाश निकम यांनी प्रशिक्षण दिले. यामध्ये ई-चलन कसे हाताळावे ? याबाबत माहिती देण्यात आली. डिजिटल पध्दतीने दंड वाहनधारकांना दिले जाईल हे दंड नाही भरले तर ते ऑनलाइन यांनी दंड भरलेला नाही असे दिसेल, व तो त्यांना भविष्यात महाराष्ट्रत कुठेही भरता येईल या प्रकारची माहिती निकम यांनी दिली. याप्रसंगी सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ व वाहतूक पोलीस कर्मचारी हजर होते.