दिगंबर महाराज मठास डीआयजी वारके यांची सदिच्छा भेट

math

फैजपूर प्रतिनिधी । श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी यात्रा महोत्सव सुरू असुन आज पंढरपूर येथील दिगंबर महाराज मठास विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी भेट दिली. संपूर्ण यात्रा महोत्सवाचे डीआयजी वारके प्रमुख आहे. यावेळी मठात त्यांचे सत्कार कार्यक्रम पार पडला. त्याचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे व उपाध्यक्ष घनश्याम पाटील यांनी केला. यावेळी दिंडी प्रमुख ह.भ.प. दुर्गादास महाराज नेहते, विशवस्थ किशोर बोरोळे, चत्रभुज खाचने, विट्ठल भंगाळे, विनायक गारसे, जयराम पाटील, जनार्धन भारंबे,भास्कर इंगळे यांच्यासह कीर्तनकार व वारकरी बांधू भगिनी उपस्थित होते. यावेळी मठात 1800 वारकरी मंडळींची उपस्थिती लाभली आहे. प्रास्तविक नरेंद्र नारखेडे यांनी करून वारीची भूमिका वसंस्थेची उभारणी वाटचाल याबाबत निवेदन केले. सूत्रसंचालन विजय राघव महाजन यांनी केले तर आभार विठ्ठल भंगाळे यांनी मानले.

Protected Content