यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील डोंगर कठोरा येथील रहिवासी डिगंबर तायडे यांनी राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करून आपल्या गुणवत्तेची मोहर उमटवली आहे.
डोंगर कठोरा येथील सर्व लहान थोरांचे परीचीत सिताराम सूका तायडे (सिताराम मास्तर) यांचे चिरंजीव व सध्या डोंबिवली मुंबई स्थित मुंबई प्रधीकरणात सिव्हील इंजीनीयर म्हणुन कार्यरत राहून सेवानिवृत्त झालेले डिगंबर सिताराम तायडे यांनी फिनॅामीनाल म्युजीक ग्रुपतर्फे संपूर्ण भारतात घेण्यात आलेल्या गाण्याची प्रतीयोगीता स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याशा अशा डोंगर कठोरा खेडेगावातील बांधवांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.सदरहू स्पर्धा ही फिनॅामीनाल म्युजीक ग्रुप तर्फे संपूर्ण देशात घेण्यात आली. यादरम्यान ज्यास्तीत ज्यास्त लाईक करण्यात आलेल्या गाण्याची निवड ही अंतिम विजेत्याच्या रूपाने त्यांच्या कडून करण्यात आली.दरम्यान तीन राउंडमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत डिगंबर तायडे यांनी गायिलेल्या गाण्येला मोठी पसंती मिळाली असुन परिणामी यात डिगंबर तायडे यांनी गायिलेल्या वो तेरे प्यार का गम सुमधुर गाण्याने आकाशाला गवसणी घालीत भारत भरातून सहभागी प्रतियोगीत्या मधून प्रथम क्रमांक पटकाविला.
या यशात त्यांना त्यांच्या धर्मपत्नी शकुंतला डिगंबर तायडे यांचा मोलाचा हातभार लाभला आहे.सदरील स्पर्धा डिगंबर तायडे यांनी स्वतःच्या मेहनतीवर जिंकली असून देखील त्यांनी या यशाचे श्रेय्य समस्त कठोरकर बांधवांचे असून यापुढील आपले संपूर्ण आयुष्य डोंगर कठोरा गावच्या विकासाकरिता वाहून घेण्यात येईल अशी भावना त्यांनी आपल्या निवडीबद्दल व्यक्त केली आहे.डिगंबर तायडे यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वत्र कौतुक केले जात आहे.