बुलढाण्यात आईच्या वाढदिवसानिमित्त मुलांनी केले विविध प्रकारचे तुला

बुलढाणा – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गं. भा. शकुंतलादेवी नामदेवरव इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त गूळ, हरबरा डाळ,व ढेप तुला करून वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला.

आज वाढदिवस म्हटलं की हाऊस मोज माझ्या पार्टी धांगडधिंगा असा आपल्याला पाहायला मिळतो. अन्नाची परमसाठ नासाडी होते. आणि फक्त सेल्फी फोटो डीपी स्टेटस नंतर या वाढदिवसाचा त्या दिवसापुरताच आस्वाद घेऊन समारोप होतो. पण जो वाढदिवस मुक्या जनावरांपर्यंत तुम्हाला तुमची आठवण ठेवण्याची एक किंबहुना संधी देतो त्याला योग्य वाढदिवस असंच म्हणावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने त्यालाच समाजातील काही चांगल्या गोष्टीला वाढदिवसाच्या दिवशी वाढ केल्याचा दिवस म्हणणं योग्य ठरेल. पण आपल्याला समाजातील काही देणे लागते याकरता चक्क आपल्या 77 वर्षे आईचा वाढदिवस एक अभिनव पद्धतीने या पिढीतील मुलांनी ठेवून एक नवीन उदाहरण समोर ठेवले आहे.

अनाठायी खर्च करून वाढदिवस साजरा करताना आपण बरेचदा पाहतो मात्र समाजातील मुक्या जनावरांप्रति असलेली आस्था आज खामगाव येथील गं. भा. शकुंतलादेवी नामदेवरव इंगळे यांच्या वाढदिवशी पाहायला मिळाली..सुटाळपुरा भागात राहणाऱ्या शकुंतला माई चा आज 77 वा वाढदिवस! साध जीवन जगत शकुंतला देवीने नऊ मुलांचं सांगोपन केलं. आज इंगळे कुटुंब व्यावसायत खामगावात नंबर वन आहे. सर्वात मोठा रामदास व त्या पाठोपाठ राजेंद्र, गुलाब, निलेश, संजय, विजय, नितीन हे त्यांची मुलं तर सौ मीरा ठाकरे व सौ रेखा डिवरे ह्या मुली ! नातवंडांची तर आज्जी लाडकीच ! या सर्व मुलं मुली, सुना व नातवंडांनी 77 वा वाढदिवस परोपकारातून करण्याचे ठरवले ! व मुक्या जनावरांसाठी चाऱ्याच्या रुपात धान्य देण्याचे ठरले. आज शकुंतलादेवी च्या वाढदिवशी लाडुतुला नव्हे तर गूळ, हरबरा डाळ,व ढेप तुला करण्यात आली आणि हे सर्व गोरक्षणात देण्यात आले. आजीने देखील या उपक्रमाचे कौतुक केले व नकळत त्यांचे सुखदाश्रू निघाले. आज सुद्धा तन-मन धनाचा योग्य वापर केला तर त्याचं समाजातच नाही तर आपल्या मनाला देखील समाधान मिळते असे म्हटल्यास वाव ठरणार नाही.

Protected Content