पाचोरा प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच शहरातील स्वामी लॉन्स येथे जळगाव लोकसभा कार्यकर्ता संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विनय भोईटे यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले येणाऱ्या नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक संधर्भात चर्चा केली. सर्व तालुक्यात गाव तिथे शाखा उघडण्याचे सांगण्यात आले. लवकच जळगाव जिल्ह्यातील राहिलेल्या नियुक्त्या करण्यात येतील, असे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रशांत पाटील (पाचोरा) यांनी केले व पाचोरा तालुक्यातील पदाधिकारी शुभम पाटील, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेंद्र पाटील, जितेंद्र नाईक, शिवम्ं देसले, शाम पाटील, निखिल शेळके, शुभम देसले, शुभम बोरसे, ज्ञानेश्वर भोई तालुक्यातील कार्यकर्ते व चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, एरंडोल, पाचोरा व भडगाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.