धुळे प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा वाढलेला संसर्ग कायम असून गत चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात ४७९ नवीन कोरोना बाधीत आढळून आले असून ११ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोना महामारीचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ४७९ रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील ११ बाधित रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ५०८ वर पोहचली आहे.
हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणारे म्हसदी (ता.साक्री) येथील ८५ वर्षीय महिला, दोंडाईचतील ६९ वर्षीय महिला, छडवेल (ता.साक्री) येथील ८४ वर्षीय पुरुष यांच्यासह एसीपीएम वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणारे धुळे तालुक्यातील उडाणे येथील २८ वर्षीय पुरुष, बोरविहीर येथील ४६ वर्षीय पुरुष, सोनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, नंदाणेतील ४५ वर्षीय पुरुष, मुकटीतील ७७ वर्षीय महिला, कुसुंब्यातील ७५ वर्षीय महिला, शिंदखेडा तालुक्यातील चिमठावळ येथील ४७ वर्षीय पुरुष आणि खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे धुळे येथील ४१ वर्षीय महिलेचा काल मृत्यू झाला.
सातत्याने वाढणारा मृत्यूदर आणि रुग्ण संख्येमुळे परिस्थितीत हाताबाहेर जाण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत.
यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ५०८ वर पोहचली आहे. आतापर्यंत मनपा हद्दीत २०८ आणि ग्रामीण भागात ३०० कोरोनाग्रस्त रुग्ण दगावले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर वाढत असताना दुसरीकडे दररोज नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या देखील मोठी आहे. कालपर्यंत जिल्ह्यात ३३ हजार ३२१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
गेल्या चोवीस तासात ४७९ जणांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात सोन्या मारुती कॉलनी १, मोरशेवडी १, समृद्धी नगर १, पारोळा रोड १, नकाने रोड १, अग्रवाल विश्राम भवन १, अक्षय कॉलनी १, सुदर्शन कॉलनी १, साक्री रोड १, अविष्कार कॉलनी १, शिवनगर कॉलनी १, विवेकानंद नगर १, जुने धुळे १, सूदया अपार्टमेंट २, स्टेशन रोड १, संभाप्पा कॉलनी १, अशोक नगर १, सानेगुरुजी सोसा. १, महात्माजी नगर १, चंदननगर १, बडगुजर प्लॉट १, रफढऋ ०४१३ी १४, मोरे सोसायटी १, धुळे ३, फागणे २, विचुर १, मोहाडी डांगरी १, जवखेडा १, आर्वी १, अवधान १, मांडळ ३, सोनेवाडी शिंदखेडा १, प्राथमिक आरोग्य केंद्र धुळे तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या २४२ अहवालांपैकी ४८ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १०६ अहवालांपैकी २४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. गायत्री नगर १, नकुल सहदेव सोसायटी ३, एकविरा कॉलनी १, इंदिरा हॉस्पिटल १, कमखेडा १, भटाणे २, खरदे १, बोराडी १, वाघाडी १, शिरपूर ६, अजनाड २, बभळाज १, धवली विहार १, दभाशी २, तसेच शिरपुर ब्लॉक रॅपिड टेस्टच्या २३२ अहवालांपैकी १९ अहवाल पॉजिटिव्ह आले. लोंढरे १, तऱ्हाडी १, सांगवी ३, नाटवाडा १, लौकी १, खर्दे १, शिरपूर ३, बोराडी १, शिरपुर १, चौडी पाडा १, सुळे ३, महादेव १, उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील १४५ अहवालांपैकी ४२ अहवाल पॉजिटिव्ह आले. दोंडाईचा १, सिंधी कॉलनी ३, विद्यानगर ३, रावळ नगर ३, शिवराज्य चौक १, हुडको कॉलनी १, अरुणा चौक १, भास्कर नगर १, डांबरी घरकुल १, स्टेशन भाग १, राणीपुरा १, महादेवपुरा १, शहादा रोड १, जिनवाला १, शिंदखेडा २, वैदाने १, रामी १, मालपूर ५, तावखेडा १, देगाव १, शेवाडे १, खोकरदे २, चिलाने १, सुराय १, नवे कोलदे ३, लामकाणी धुळे १, तसेच शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टच्या १३७ अहवालांपैकी ११ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. सोनेवाडी २, साईनगर शिंदखेडा १, वरुळ चौफुली शिंदखेडा १, बागवान गल्ली १, धमाणे १, चिरणे १, चौगाव १, सोनशेलु १, जुना भोई वाडा शिंदखेडा १, जवादा १, भाडणे साक्री सीसीसीमधील ९९ अहवालांपैकी ६ अहवाल पॉजिटिव्ह आले. महावीर नगर साक्री १, शिवाजी नगर साक्री १, शेवगे २, निजामपूर १, पिंपळगाव १, तसेच रॅपिड अँटीजन टेस्टच्या ८९७ अहवालांपैकी १०९ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. साक्री १, चिंचपाडा १, भाडने १, बल्हाने २, पारगाव १, विटावे १, कोर्डे १, वरसुज १, धवळी विहीर २, वाल्हवे ३, पन्हाळीपाडा १, वड पाडा १, छाईल १, कासारे ६, मालपुर २, सायने १, उंभारे १, सातर पाडा १, खडकबारी १, रोहोड १, दहीवेल ३, बोदगाव १, मैदाने ४, चिंचपाडा २, मालनगाव २, रायपुर १, दारखेल १, निळगव्हाण १, सामोडे १, अष्टाने १, साक्री ३, वर्धने १, उरणमाळ १, धुळे १, घोडदाणे १, आंबे मोहर १, आमली १, जैताने १, बळसाने १, परेंजपूर १५, काक शेवडे १, खटाळीपाडा १, पोबारा २, पान खेडा १, म्हसदी २, काकाणी १, पिंपळनेर ४, सामोडे २, बल्हाने २, वंजारा तांडा २, चिकसे १, कुहेर १, पिंपळपाडा १, करंझटी २, जामखेल १, रोहोड ३, मचमाळ ३, हनुमंतपाडा २, जाम झीरा १, बहिरम पाडा १, नांदरखी १, केळीपाडा १, मनपा सीसीसीमधील ५४ अहवालांपैकी १४ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. अजिंक्यतारा सोसा. ४, सत्संग कॉलनी ७, सुंदर नगर ३, तसेच मनपा यूपीएचसी रॅपिड अँटीजन टेस्टच्या १७४६ अहवालांपैकी १९ अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ७० अहवालांपैकी १५ अहवाल पॉजीटिव्ह आले. धुळे १२, कुसुम्बा १, फागणे १, पिंपळनेर १, चाळीसगाव १, आंबेजोगाई १, एसीपीएम लॅब मधील ५९ अहवालापैकी २७ अहवाल पॉजीटिव्ह आले आहे. देवपूर धुळे ३, चितोड रोड १, साक्री रोड १, कुसुम्बा १, चौगाव १, धुळे २, बोराडी शिरपूर १, साक्री ८, मोहाडी ९, अमळनेर १, खाजगी लॅबमधील ३३६ अहवालापैकी ८१ अहवाल पॉजिटिव्ह आले. वाखारकर नगर १, शिवानंद सोसायटी मोहाडी १, जीटीपी कॉलोनी १, दोंदे कॉलनी १, सुभाष नगर ६, नवीन कोर्टामागे जीवन ज्योत हौसिंग सोसायटी २, पारोळा रोड १, लक्ष्मी नगर १, अग्रवाल नगर ३, रेल्वे स्टेशन जवळ १, फॉरेस्ट कॉलनी १, मोहाडी १, धुळे इतर २, सुशील नगर १, श्रद्धा नगर १, जयहिंद कॉलनी १, वाडीभोकर रोड २, तिरुपती नगर १, बडगुजर कॉलनी १, प्रजापती कॉलनी १, साई कृपा हाऊसिंग सोसायटी १, राज सारथी सोसायटी १, मालेगाव रोड १, देवपुर धुळे १,प्रियदर्शन नगर १, कालिका नगर १, सुंदर नगर १, रामनगर १, जय मल्हार नगर १, पवन नगर २, ओम नगर १, छत्रपती नगर १ गणेश कॉलनी १, स्वप्ननगरी अपार्टमेंट १, प्रभात नगर १, सदिच्छा नगर १, वैभव कॉलनी १, शिवाजीनगर २, राम नगर १, विद्या नगर १, पंडित स्मृती वाडीभोकर रोड जयहिंद सीनियर कॉलेज समोर १, माऊली नगर वरखेडीरोड २, रानमळा १, नवल नगर १, वार कुंडाणे १, आर्वी १, वरखेडे ४, कुसुंबा १, सरवड १, कापडणे १, फागणे १, सडगाव १, सोनगीर १, बोरीस १, दिघावे १ , साक्री १ , अकलाड मोराने १, कढरे बळसाने १, दोंडाईचा सिंधी कॉलनी १, बेटावद १, एकविरा कॉ शिंदखेडा २, चिमठावळ १, सोनशेलु १, रांझाणी शिंदखेडा १, उंबरखेड पारोळा २, नंदुरबार २, नाशिक २, जळगाव २ यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ.विशाल पाटील यांनी दिली.