धुळे प्रतिनिधी । गत चोवीस तासांमध्ये धुळे जिल्ह्यात १८६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून यात सर्वाधीक पॉझिटीव्ह पेशंटची संख्या ही शहरातील असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या माहितीतून अधोरेखीत झाले आहे.
प्रशासनाने अनेक उपाययोजना करून देखील धुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गत चोवीस सातांमध्ये जिल्ह्यात १८६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. तर मंगळवारी दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील पाच जणांचा समावेश आहे. शहरातील मृतांची संख्या बुधवारी २५० तर ग्रामीण भागाची चारशेच्या उंबरठ्यावर गेली आहे. जिल्ह्यात मंगळवारी १८६ नवे रुग्ण आढळून आले.