जळगाव प्रतिनिधी । धावत्या रेल्वेतून तोल जावून पडल्याने तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 3 वाजेच्या सुमारास घडली असून जखमी जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, विकास कुमार हिरालाला श्रीषीदेव (वय-19) रा. देवपूरा पो खवाटपूरा जि. अररिया बिहार हा 18 ऑक्टोंबर रोजी अहमदाबाद एक्सप्रेसने अहमदाबादकडे जाण्यासाठी रेल्वेने निघाला. 20 रोजीच्या पहाटे सकाळी 3 वाजेच्या सुमारास धरणगाव ते चावलखेडा दरम्यान त्याल डुलकी लागल्याने तोल जावून खाली पडला. यात विकास गंभीर जखमी झाला असून त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसात नोंद करण्यात आली आहे.