धरणगावातून पुरग्रस्तांना मदत

dharangav

 

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातून राजे प्रतिष्ठानतर्फे आज दि. 13 ऑगस्ट रोजी कोल्हापुर नागरिकांसाठी लागण्या-या जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून देण्यात येत आहेत.

याबाबत माहिती अशी की, राजे प्रतिष्ठानतर्फे पुरग्रस्तांसाठीच्या मदतीच्या विनंतीला भरघोस प्रतिसाद मिळाला असून आज कोल्हापूरवासियांसाठी धरणगावातून 1 टेम्पो भरून “100 ब्लॅंकेटस्, गहू, तांदूळ, कडधान्यच्या गोण्या, पाण्याच्या बोटल्स्, बिस्कीट पाकिटांचे बॉक्स, नाश्त्याची पाकीटचे बॉक्स अशाप्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची जळगाव टीमकडे रवाना करण्यात आली आहे. तिथून ती थेट कोल्हापूर इथे पोहचविण्यात येणार आहे. राजे प्रतिष्ठानच्या विनंतीला प्रतिसाद म्हणून विश्व हिंदू परिषदचे सहकारी, राजे प्रतिष्ठान बिलखेडा, राजे प्रतिष्ठान भोणे, राजे प्रतिष्ठान बाभोरी, राजे प्रतिष्ठान गंगापूरी, तसेच धरणगावातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी मदत केली आहे.
सहकार्य केलेल्यांचे मनापासून आभार राजे प्रतिष्ठान धरणगाव, शिवजयंती उत्सव समिती धरणगाव, विश्वाहिंदू परिषद धरणगावाच्या वतीने मान्यत येत आहेत.

Protected Content