धरणगाव (प्रतिनिधी) शांतता कमेटीची मिटिंग शहरातील सर्व पक्षीय नेते, प्रमुख सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणे अपेक्षित असते. या मिटिंगमध्ये गावात शांतात कशी राहील तसेच विविध सण,उत्सव शांतेत कसे पार पडतील, यावर समाजातील सर्वच घटकांसोबत चर्चा अपेक्षित असते. परंतू धरणगावात या गोष्टींना काही दिवसांपासून फाटा दिला जातोय, असा खळबळजनक आरोप संभाजी बिग्रेडचे गोपाल पाटील यांनी केला आहे. तसेच शांतता कमेटीची फक्त काही बडे नेते आणि दोन नंबरवाल्यांनाचसाठीच असते का? असा सवालही श्री. पाटील यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात अधिक असे की, आगामी ईद आणि राम जन्म भूमी निकालाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव पोलीस स्थानकात शांतता कमेटीची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. परंतू या बैठकीत अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांसह पत्रकारांनाही बोलाविण्यात आले नव्हेत. याच पार्श्वभूमीवर संभाजी बिग्रेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील यांनी आरोप केले आहेत. काही दिवसापासून शांतता कमेटीच्या बैठकीत काही निवडक लोकांनाच बोलाविले जात आहे. एवढेच नव्हे, तर विशिष्ठ पक्षातील लोकांनाच सन्मान दिला जातोय. गणेश उत्सवाच्या वेळी देखील धरणगाव शहरातील आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले नव्हते. तसेच प्रत्येक बैठकीला त्याच त्याच नेत्यांना व्यासपीठावर बसविले जाते.
सगळ्यास धक्कादायक म्हणजे अनेक दोन नंबरवाले पण या मिटिंगमध्ये सन्मानजनकरित्या वावरतांना दिसून येतात. इतर पक्षातील नेत्यांना कधीही सन्मान दिला जात नाही. त्यामुळे शांतता कमेटीची फक्त काही बडे नेते आणि दोन नंबरवाल्यांनाचसाठीच असते का? असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे. दरम्यान, या संदर्भात लवकरच आपण संभाजी बिग्रेडच्या तालुका तथा जिल्हा पदाधिकाऱ्यांसह पुलिस अधीक्षक साहेबांची भेट घेणार आहोत. यापुढे शांतात कमेटीच्या मिटिंगमध्ये सर्वच पक्षातील नेत्यांचा सन्मान झाला पाहिजे. तसेच दोन नंबरवाल्यांना या मिटिंग मधून प्रतिबंधित केले पाहिजे अशी मागणी देखील गोपाल पाटील यांनी केली आहे.