धरणगाव प्रतिनिधी । येथील महाविद्यालयात गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वीतांना पारितोषीक प्रदान करण्यात आले.
धरणगाव येथे गणेश उत्सवानिमित्त येथील महाविद्यालयात विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात रांगोळी स्पर्धा, खो खो,क्रिकेट अशा अनेक प्रकारे स्पर्धा घेण्यात आले. यात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना प्रा. बिराजदार सर, वा. ना. आंधळे, सिंगाने सर, पवन महाजन, विकी महाजन व विशाल चौधरी,यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.