धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे सरत्या वर्षाला निरोप देतांना नववर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतांनाच शहरात एकाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव रोडवर जळगाव रोडवर एका जिनींगमध्ये कामाला असलेल्या अरूण रमेश भील उर्फ कालू (वय सुमारे ३० वर्षे) या तरूणाची रात्री नऊच्या सुमारास क्रूर हत्या करण्यात आली. ही माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळाल्यानंतर धरणगाव पोलीस स्थानकाचे पीआय राहूल खताळ आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या संदर्भात धरणगाव पोलीस स्थानकात भादंवि कलम ३०२, १४१, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राहूल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद संदानशीव, राजेंद्र पाटील, जिभाऊ पाटील, राहूल गुंजाळ व संजय सूर्यवंशी, नाना ठाकरे, प्रमोद पाटील, मिलींद सोनार हे करीत आहेत. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणाती परिसरात झाडाझडती सुरू होती. यात चौकशीसाठी काहींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.