धरणगाव (प्रतिनिधी) येथील नगर पालिकेत आज सकाळी शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठक झाली. त्यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकाला पेढे भरविले. तर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आज सकाळी पालिका सभागृहात प्रभारी नगराध्यक्षा अंजलीताई विसावे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे, ज्ञानेश्वर महाजन, राजू महाजन, निलेश चौधरी, सी.के.पाटील, रवींद्र कंखरे, धीरेंद्र पुर्भे, योगेश वाघ, विलास महाजन, चंदन पाटील,संजय चौधरी, भानुदास विसावे, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.