धरणगाव आय.टी.आय. संस्थेत “संविधान मंदिर” लोकार्पण सोहळा उत्साहात

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील ४३४ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थासह धरणगाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे उदघाटन झाले. यावेळी धरणगाव आयटीआय येथे ‘संविधान मंदिर’ लोकार्पण उदघाट्न सोहळा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.’संविधान मंदिर’ लोकार्पण कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे दिपक नेरकर यांनी तर बहारदार सूत्रसंचालन दिलीप वाघ यांनी केले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील ४३४ आय.टी.आय. मध्ये संविधान मंदिर साकारले गेले. आपल्याला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने भारतीय संविधानाच्या माध्यमातून जगातील सर्वात महान लोकशाही दिली असून भारतीय संविधानाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले. तत्पूर्वी जेष्ठ साहित्यिक तथा व्याख्याते डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी भाष्य केले की, समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक, न्यायाची खरी शिकवण ही भारताच्या संविधानातून प्राप्त होते.

खऱ्या अर्थानं भारतीय संविधान प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. तद्नंतर माहिती अधिकार कायदा महासंघाचे राजेंद्र वाघ यांनी भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक प्राणीजातीला मौलिक हक्क, अधिकार दिलेले आहेत. तसेच ‘उद्देशिका’ भारतीय संविधानाचा खरा गाभा असल्याचेही ते म्हणाले. संस्थेचे प्र.प्राचार्य एम ए मराठे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संस्थेत शिकत असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला भारतीय संविधानाची शिकवण देणार असून संविधान निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजच्या पिढीला माहिती व्हावे यासाठी आमची संस्था यापुढे देखील नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणार असल्याचे प्रा.मराठे यांनी सांगितले. याप्रसंगी गटविकास अधिकारी सुशांत पाटील, विनय भावे, जानकीराम पाटील, मुकुंद नन्नवरे, प्रेमराज पाटील, भानुदास विसावे, वासुदेव चौधरी, ॲड.व्ही एस भोलाणे, भगीरथ माळी, विनोद रोकडे, विलास महाजन, गुलाब मराठे, रविंद्र महाजन, बाळासाहेब जाधव, राहुल जैन, प्रतीक जैन, प्रशिक्षणार्थी, विद्यार्थी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे जेष्ठ शिक्षक डी एल परदेशी, भूषण रानवे, नंदा कापडे, श्यामल भरते, ऋतू राठोड, लोकेश चावरे, एस आर चव्हाण, आर ए मोरे यांसह मेस्को चे विठ्ठल पाटील, सतिष पाटील, शांताराम जाधव आदींनी परिश्रम घेतले. डी एल परदेशी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Protected Content