धरणगाव प्रतिनिधी । दत्त जयंतीनिमित्त येथील जुनी पोलीस लाईन अग्नी आखाडा येथे १० डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे होम हवनाचा कार्यक्रमास गादीचे अधिपती राजयोगी धनराजनाथजी यांच्याहस्ते शुभारंभ व सांगता होणार आहे. होमहवनाचा समाप्तीनंतर भक्तगण देखिल मंत्रोपच्चार व्दारे हवनास आहुती व पुजन करुन हा सोहळा पार पाडणार आहे. रात्री ठिक ८ वाजता प्रवचनाचा गायनाचा कार्यक्रमास आरंभ श्री धनराजनाथजी यांच्या स्वमुखातून प्रवचन तथा किर्तनाचा कार्यक्रमास शुभारंभ सांगता व सुरुवात होईल.
दत्तजयंती विषयी मार्गदर्शन
यात ते दत्तजयंती निमित्ताने धार्मिक तथा संस्कृती या विषयावर सत्संगा व्दारे आपले अनमोल मनोगत व दत्तजयंती आपण का साजरी करतो ? या बद्दल सध्दा मार्गदर्शन करणार आहे. भगवती स्वरुपा सुनंदा देविजी, भगवती स्वरुपा शंकुतला देविजी, भगवती स्वरुपा पुष्पादेविजी, भगवती स्वरुपा रजनी देविजी या चार ही माताजी आपल्या भक्तगणांना दत्त जयंती विषयी आपले अनमोल मार्गदर्शन करणार आहे.
अन्नदानाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम
११ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी भगवान श्री जगदगुरु व दतात्रयांचे शास्त्रोक्त पद्धतीव्दारे अभिषेक व काकड आरतीस प्रारंभ होईल. अखंड दत्तनाम जप सुरुवात राहील यानंतर दुपारी भोजनाच्या आरतीस प्रारंभ होवुन अन्नदानाचा व महाप्रसादाचा कार्यक्रम दुपारी १२ ते ५ या दरम्यान सुरु राहील. या दत्तजयंती महाउत्सव निमित्ताने या कार्यक्रमास दुर दुरुन आलेले भक्त गण, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, विदर्भ या स्थानातुन भक्तगणांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास यशस्वितेकडे नेणारे सेवेकरी व भक्तगण नामे किशोर परदेशी, अशोक परदेशी, ईश्वर परदेशी, आकाश परदेशी, जयंत पाटील, देविदास पाटील, फकिरा मराठे, रविंद्र जगताप, डिगंबर चौधरी, बाळु चौधरी, तुकाराम चौधरी आदी परिश्रम घेत आहे.