राष्ट्रीय सेवा योजना एक सामाजिक चळवळ- डॉ. अरुण कुलकर्णी

dharangaon news

धरणगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय सेवा ही एक सामाजिक चळवळ झाली आहे.देशहिताच्या प्रश्नांसाठी तरुणांनी जनजागृती करणे काळाची असन भारत देशाचे भवितव्य तरुणांच्याच हाती असल्याचे प्रतिपादन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी यांनी रा.से.यो. वरिष्ठ महाविद्यालयाच्या पस्टाणे येथे विशेष हिवाळी श्रमसंसकार शिबीराच्या उदघाटन प्रसंगी केले.

येथील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे १७ डिसेंबर ते २३ डिसेंबर २०१९ या कालावधीत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन दत्तक गाव पस्टाणे येथे करण्यात आले आहे.

क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या राष्ट्रीय सेवा योजना, एक भारत श्रेष्ठ भारत, संविधान दिन ते राष्ट्रीय समरसता दिन अभियान तसेच स्वच्छ कॅम्पस मिशन या संकल्पपूर्तीसाठी ११० विद्यार्थी स्वयंसेवक शिबीरार्थी सहभाग असलेल्या शिबीराचे दि.१७ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता पस्टाणे येथे प.रा.हायस्कुल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व जि.प.शाळेची विद्यार्थीनी कु.नंदिनी सोनवणे यांनी प.रा.हायस्कुल सोसायटीचे सचिव डॉ.मिलींद डहाळे यांच्या उपस्थितीत शिबीराचे उदघाटन संपन्न झाले.

जिल्हा परिषद सदस्य गोपाल भाऊ चौधरी, पंचायत समिती सदस्य प्रेमराज पाटील, युवा नेते सरपंच किशोर निकम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकासाठी प्रयत्नशिल असलेल्या पस्टाणे या गावात शिक्षण, आरोग्य , पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, जलसाक्षरता, सेंद्रिय खत व जैविक खत वापर, एक भारत श्रेष्ठ भारत याबाबत जनजागृती करण्यासाठी या शिबीरात राष्ट्रीय सेवा योजनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.टी.एस.बिराजदार, प्रा.डॉ.के.एम.पाटील, प्रा.संजय शिंगाणे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमअधिकारी प्रा.डॉ.दिपक बोंडे, सहा.कार्यक्रमअधिकारी प्रा.डॉ.अभिजित जोशी, प्रा. गौरव महाजन, प्रा.डॉ.जाधव, प्रा.डॉ.ज्योती महाजन यांच्या पुढाकराने सोशल मिडिया आणि युवा पिढी, एन.एस.एस स्यंसेवक आणि स्फुर्तीगीते, NSS आणि सामाजिक योगदान, कॅशलेस टू लेसकॅश व्यक्तीमत्व विकास, सेंद्रिय शेती : काळाची गरज, शासकीय योजनांची माहिती, कलेतून मिळतो पुनर्जन्म, सामाजिक समरसता आणि युवक, अवयव दान:महादान , ओडिसा राज्य: कला, संस्कृती, इतिहास आणि पर्यटन, जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर अनुक्रमे विजय वाघमारे, प्रा.डॉ.धनंजय चौधरी, प्रा.डॉ.के.आर.पाठक, डि.जी.चव्हाण, प्रा.डॉ.विलास चव्हाण, अभिनव माळी, संदिप घोरपडे, प्रा.वा.ना.आंधळे, प्रा.आर.एन.महाजन, डॉ.काजल फिरके, प्रा.संजय शिंगाणे, प्रा. आर. एन.भदाणे इ. मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.एक भारत श्रेष्ठ भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना समाजात रुजण्यासाठी डिजीटल साक्षरता, मानसिक आरोग्य आणि ताणतणान व्यवस्थापन, संविधान व राष्ट्रीय एकत्मता, वैज्ञानिक दृष्टीकोन, ग्रामविकास आणि युवक, स्वयंरोजगार:संधी आणि गरज, एडस:समज गैरसमज या विषयावर अनुक्रमे प्रा.डॉ.प्रविण बोरसे, प्रा.संदिप पालखे, प्रा.डॉ.विजयानंद वारडे, प्रा.सौ.बिरारी मॅडम, प्रा.डॉ.छाया सुखदाणे, प्रा.एस.आर.अत्तरदे या मान्यवरांच्या अध्यक्षेखाली गटचर्चा आयोजित करण्यात आली आहे.त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, राजर्षी शाहू महाराज, संत गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे इ. गट तयार करण्यात आले आहे.

प.रा.हायस्कुल सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अरुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली २३ डिसेंबर रोजी सकाळी ११.००वाजता प्रा.डी.आर.पाटील, सदस्य , व्यवस्थापन मंडळ, कबचौउम विद्यापीठ जळगाव, प्रा.डॉ.पंकजकुमार नन्नवरे, संचालक, रासेयो कबचौउम विद्यापीठ जळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होत असलेल्या शिबीरासाठी प्रा.संजय शिगाणे, प्रा.राजू केंद्रे, प्रा.विजयानंद वारडे, प्रा.संदिप पालखे, प्रा.डॉ.अरुण वळवी, प्रा.पंकज देशमुख, प्रा.दिपक पाटील, प्रा.वळवी, प्रा.भालेराव, प्रा. गायकवाड, प्रा.वाघमारे, प्रा.डॉ.खरे, प्रा.केदार, प्रा.डी.बी.जाधव, प्रा.धनंजय कापडणे, दिलीप चव्हाण, किरण सुतारे, जितेंद्र बयस , संजय तोडे यासह तेजेश्वर पाटील, कु.काजल पाटील, हेम सावला परिश्रम घेत आहे. विद्यार्थी, पालक, पष्टाणे गावातील गावकरी यांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन एक भारत श्रेष्ठ भारत, राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना समाजात रुजविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ.टी.एस.बिराजदार यांचेसह शिबिराचे संयोजक कार्यक्रमअधिकारी प्रा.डॉ.दिपक बोंडे, सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.अभिजित जोशी, प्रा.डॉ.जाधव, प्रा. गौरव महाजन, प्रा.डॉ.ज्योती महाजन यांनी केले आहे.

Protected Content