धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धरणगाव शहरातील नागरिकांना एप्रिल महिन्यापर्यंत पिण्याचे शुध्द पाणी नियमीतपणे मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी येथील कार्यक्रमात केले.
येथे बाळासाहेबांची शिवसेना महिला मंडळातर्फे मकर संक्रांतीनिमित्त महिलांच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री जळगाव बुलढाणा जिल्ह्यातील पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील साहेब यांनी सर्व माता भगिनींना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, अनेक वर्षापासून माझ्या माता भगिनी नेहमी पाणीपुरवठ्या पासून वंचित होत्या त्यांना पाण्यासाठी खूप कष्ट करावे लागले खूप अडचणी त्यांना पाण्यासाठी येत होत्या परंतु आता एप्रिल २०२३ पासून एक दिवसाआड शुद्ध पाणीपुरवठा होईल. हीच आपल्या भावाकडून मुलाकडून मकर संक्रांतीची आपल्याला भेट आहे.
या कार्यक्रमात जळगाव जिल्हा महिला संपर्क प्रमुख सरीताताई कोल्हे, बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी एम पाटील , जिल्हा परिषद सदस्य युवा नेते प्रतापराव पाटील,जळगाव महानगर प्रमुख श्रीमती शोभाताई चौधरी,उपजिल्हा प्रमुख अश्विनी भाटिया,महिला तालुका प्रमुख मायाताई देवरे,तालुका प्रमुख प्रिया इंगळे,महिला शहर प्रमुख भारतीताई चौधरी,माजी प्रभारी नगराध्यक्ष सौ कल्पना विलास महाजन,माजी प्रभारी नगराध्यक्ष सौ सुरेखाताई विजय महाजन,माजी प्रभारी नगराध्यक्ष सौ अंजलीताई भानुदास विसावे,महिला उपशहर प्रमुख मोनाली योगेश पाटील,बाळासाहेबांची शिवसेनेचे नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक बाळासाहेबांची शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व हजारोच्या संख्येने धरणगाव शहरातील महिला उपस्थित होते.