धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव शहरात १२ डिसेंबर रोजी रात्री काही रिक्षांमधील बॅटरी चोरीस गेल्या होत्या. या गुन्ह्यातील संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अटक करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, ईश्वर बाबुराव पाटील (रा.झुरखेडा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित विशाल विक्रम भोई (वय २०, रा. वाल्मिकनगर) या संशयिताने एका साथीदाराच्या मदतीने सहा बॅटऱ्यांची चोरी केली होती. बॅटरी विक्री करीत असताना पोलिसांना गुप्तमाहिती मिळाली होती. त्यानुसार विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, प्रमोद लाडवंजारी व अशोक पाटील यांच्या पथकाने सोमवारी भोई याला ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला धरणगाव पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.