जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।
खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील मुख्याध्यापिका सौ रेखा पाटील या 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या जागी शाळेच्या उपशिक्षिका सौ धनश्री कृष्णकुमार फालक यांना 1 जून 2023रोजी मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळाली.
याप्रसंगी शाळेच्या मावळत्या मुख्याध्यापिका रेखा पाटील व शाळेचे शिक्षण समन्वयक
चंद्रकात भंडारी, नवनियुक्त मुख्याध्यापिका धनश्री फालक यांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच त्यांचे आप्तेष्ट व पालक वर्ग शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते .