धानोरा (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील अखेरचे गाव म्हणून ओळखले जाणारे गाव म्हणजे धानोरा. येथे नुकत्याच (३१ मे) झालेल्या ग्रामसभेत पाणीटंचाई, महिला शौचालये, अवैध नळ जोडणी, गावातील अन्य विकास कामे या विषयांवरून चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी या विषयांकडे पाठ फिरवल्याने त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
सरपंच किर्ती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. गावात १०-१२ दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात असुनही आज ग्रामसभा असताना पाणी पुरवठा करणारा कर्मचारी मात्र रजेवर गेलेला होता. त्यामुळे गावातला पाणी पुरवठा अधांतरी असल्याचे आढळून आले आहे. गावातील व्यायाम शाळेत साहित्य नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महीला शौचालयाची दुरवस्था असुन त्वरित दुरुस्तीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अपंगासाठी निधी मिळत नसल्याने त्याबद्दलही खंत व्यक्त करण्यात येत आहे.
या ग्रामसभेला पंचायत समिती सद्स्या कल्पना पाटील, ग्रामसेवक बापू कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रा रेखा महाजन, सुरेद्र महाजन, कैलास महाजन, अशोक महाजन, अजना साळुंखे, रामदास पारधी, मंगला पारधी, राजमल महाजन, पोलीस पाटील दिनेश पाटील यांच्यासह आबेडकर नगर, कोळीवाळा, ईस्लापुरा भागातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आठ ग्रामपंचायत सदस्य मात्र अनुपस्थित होते.