Home धर्म-समाज एस.टी. आरक्षणासाठी रावेरमध्ये धनगर समाजाचा भव्य रस्ता रोको आंदोलन

एस.टी. आरक्षणासाठी रावेरमध्ये धनगर समाजाचा भव्य रस्ता रोको आंदोलन


रावेर : लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एस.टी. आरक्षणाच्या मागणीसाठी रावेर येथील सकल धनगर समाजाने बुधवार, १ ऑक्टोबर दुपारी १ वाजता बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर भव्य रस्ता रोको आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला. हे आंदोलन नविन शासकीय विश्रामगृहाजवळ पार पडले. समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला वेग देण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.

सकल धनगर समाजाच्या नेतृत्वाखालील या चक्काजाम आंदोलनात शेकडो समाजबांधवांनी सहभाग घेतला. या आंदोलनादरम्यान नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांना समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये एस.टी. आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी ठामपणे मांडण्यात आली. सरकारकडून वारंवार आश्वासने मिळत असूनही प्रत्यक्षात काहीच कार्यवाही केली जात नसल्याने समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे.

आंदोलनाचे मार्गदर्शन सुरेश धनके, संदीप सावळे, ॲड. प्रविण पाचपोळे, नंदुभाऊ महाजन, राजन लासुरकर आदींनी केले. आंदोलनाची प्रस्तावना लखन सावळे यांनी केली. तसेच आंदोलनात गणेश बोरसे, सचिन बोरसे, ॲड. भास्कर निळे, गणेश सावळे, रमेश सावळे, बाजार समिती संचालक जयेश कुयटे, स्वप्नील लासुरकर सर, चंद्रकांत वैदकर, प्रविण अजलसोंडे, धीरज धनके, धीरज सावळे, संजय बोरसे, ज्ञानेश्वर अजलसोंडे, शुभम नमायते, तुषार कचरे, हेमराज लासुरे, मनोज बोरसे, मोहन बोरसे, मनोज धनगर, कैलास पाचपोळे, राजूभाऊ पाचपोळे, जितू सावळे, रामभाऊ सावळे, ईश्वर सावळे, अर्जुन सावळे, प्रशांत धनगर, साहेबराव धनगर, दीपक पाचपोळे, किरण सावडे, सागर बोरसे, निलेश सावळे, स्वप्निल सोनवणे यांच्यासह असंख्य समाज बांधव सहभागी झाले होते.

धनगर समाजाच्या या शांततामय आणि संघटित आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आंदोलनकर्त्यांनी संविधानिक मार्गाने आपली मागणी लावून धरत संयमाचे उदाहरण घालून दिले.

या आंदोलनाद्वारे शासनाला पुन्हा एकदा इशारा देण्यात आला की, एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. समाजातील असंतोष ओळखून शासनाने तत्काळ सकारात्मक पावले उचलावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Protected Content

Play sound