धरणगाव, प्रतिनिधी | आज दुपारी १.०० वाजेच्या सुमारास शहरात अचानक प्रचंड मोठा स्फोट सदृश्य आवाज ऐकू आल्याने नागरिक काही वेळ घाबरून घराबाहेर आले होते. या स्फोटाचे उगमस्थान न कळल्यामुळे शहरात बराचवेळ संभ्रमाची स्थिती होती.
अशाप्रकारचे स्फोट सदृश्य आवाज या आधीही अनेकदा विविध ठिकाणी ऐकायला आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावेळीही आवाजाचे उगमस्थान कुणाच्या लक्षात आले नव्हते. या आवाजाबद्दल स्थानिक पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांना विचारणा केली असता, त्यांना याबाबत काहीच माहित नव्हते. त्यामुळे या आवाजाचे गूढ कायम आहे.
यापूर्वी वेगवेगळ्या गावांत ऐकू आलेल्या आवाजांबद्दल भूगर्भ आणि पर्यावरण तज्ञांनी हे आवाज हवामानाचा अंदाज घेण्यासाठी सोडलेल्या रॉकेटच्या धुराच्या स्फोटाने आले असावे, असे म्हटले होते.