Home Cities धरणगाव धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणूक : १२ उमेदवारांचे १९ अर्ज दाखल

धरणगाव नगराध्यक्ष पोटनिवडणूक : १२ उमेदवारांचे १९ अर्ज दाखल


EVM

धरणगाव, प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत आज (दि.११) डिसेंबर रोजी आठ इच्छुकांनी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आता उमेदवारी दाखल करण्यासाठी केवळ उद्याचा एक दिवस उरला आहे.आतापर्यंत एकूण १२ जणांनी १९ अर्ज दाखल केले आहेत.

 

आज उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांत गुलाबराव रतन वाघ, उषा गुलाबराव वाघ व राजेंद्र किसन महाजन यांनी शिवसेनेकडून प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. हाजी शेख इब्राहिम अब्दुल रसूल, संजय एकनाथ माळी निलेश भागवत चौधरी व संभाजी गोविंदा धनगर यांनी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात एक अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस व एक अपक्ष म्हणून दाखल केलेला आहे. येवले ललित रामकृष्ण यांनीही दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी एक अर्ज भाजपाकडून व एक अपक्ष म्हणून दाखल केला आहे.


Protected Content

Play sound