धरणगावला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी बांधील : निलेश चौधरी

nilesh chaudhari1

 

धरणगाव (प्रतिनिधी) लवकरच आमदार गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्री बनणार आहेत. त्यामुळे शहरात नियमित पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक असणारी नवीन पाईप लाईन योजना तातडीने पूर्ण करणे शक्य होणार आहे. यावेळीही धरणगावकरांनी आशीर्वाद दिल्यास फिल्टर प्लांट प्रमाणे नियमित पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देखील पूर्ण करण्यास शिवसेना बांधील असल्याचे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचे शिवसेना-कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार निलेश सुरेश चौधरी यांनी केले आहे.

 

आपल्या प्रचार दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधतांना चौधरी म्हणाले की, धरणगाव शहरातील पाणीपुरवठा सुरळीत पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी संपूर्ण गावात नवीन पाईप लाईन टाकावी लागणार आहे. शहरातील पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून पाइपलाइनचे काम युद्ध पातळीवर उरकण्यात येईल. जेणे करून लवकरात लवकर शहराला नियमित पाणी पुरवठा होईल. शहरातील पाणी पुरवठ्यासाठी खास वेळापत्रक तयार करून वेळापत्रकानुसार संपूर्ण गावात पाणी पुरवठा करण्यात येईल. त्यामुळे पाणी पुरवठा पूर्ण दाबाने होईल आणि नागरिकांना पाण्याची मोटार लावावी लागणार नाही. यामुळे विजेची बचत होत, नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पाईप लाईन गावात टाकण्याचे काम जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे आहे आणि यासाठी धरणगावकरांनी पुन्हा एकदा शिवसेनेला संधी द्यावी. लवकरच आमदार गुलाबराव पाटील हे कॅबिनेट मंत्री बनणार आहेत. त्यामुळे नवीन पाईप लाईनची योजना लवकर कार्यान्वित करणे शक्य होणार होईल. धरणगावकरांनी आशीर्वाद दिल्यास शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यास आपण बांधील असल्याचेही निलेश चौधरी यांनी म्हटले आहे.

Protected Content