Home राजकीय धनंजय चौधरींच्या रावेर विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराचा शुभारंभ

धनंजय चौधरींच्या रावेर विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराचा शुभारंभ


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर विधानसभा क्षेत्र काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मौजे फैजपूर येथील तीर्थक्षेत्र खंडोबा महाराज मंदिर येथे माजी आमदार रमेश चौधरी, आमदार शिरीष चौधरी काँग्रेस पक्षाचे जिल्हाअध्यक्ष प्रदीप पवार, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, शिवसेना जिल्हा समनव्यवक प्रल्हादकाका महाजन, माजी जिल्हापरिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे,लिलाधर चौधरी, किशोर पाटील,प्रा मुकेश येवले सर,हरीशशेठ गणवाणी, दिपक पाटील, गोंडू महाजन, राजु सवरने, भालचंद्र भंगाळे, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थिती मध्ये प्रचार नारळ फोडून विधानसभा मतदार संघात प्रचारास सुरवात केली.

 

यावेळी धनंजय चौधरी यांनी उपस्थितांना संबोधताना सांगितले की आम्ही आमची पिढी ही ही सामाजिक कार्यासाठी अखंड सेवा देणारी पिढी आहे आता आता वेगवेगळ्या पद्धतीचे राजकारण करणं चालू आहे अहो पण आम्ही सकाळी उठल्यापासून आमची सुरुवातच ही रामनामाने होते तर यामध्ये हे द्वेषाचे राजकारण का करावे. माझ्यासाठी आज तुम्ही सगळे नेते मंडळी आणि जेष्ठ एकत्र आले मी आज एक शब्द देतो आज मला दिलेला तुमचा प्रत्येक वेळ आम्ही सत्कारणी लावण्याचा तर प्रयत्न करेलच मात्र माझी येणारे पुढचे सगळे वर्ष ही माझ्या जनसेवेसाठी लावेल असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound