कौटुंबिक हिंसाचारात धनंजय मुंडे दोषी

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. धनंजय मुंडे यांना दोषी मानून करुणा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहेत.

राज्याचे मंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामध्ये करुणा मुंडे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचारामध्ये दोषी ठरवले आहे.

करुणा मुंडे यांनी दरमहा १५ लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दिलासा दिल्यानंतर करुणा मुंडे यांना दरमहा २ लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहेत. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंसाचाराची केस दाखल केली होती. यामध्ये कोर्टाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवले आहे.

Protected Content