बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजपच्या नेत्या आणि विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांनी आज भगवान गडावर दरवर्षीप्रमाणे दसरा मेळाव्याचे आयोजन केले होत. या मेळाव्याला माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह मंत्री धनंजय मुंडेही उपस्थित होते. विशेष म्हणजे धनंजय मुंडे १२ वर्षांनी पंकजा यांच्या दसरा मेळव्याला उपस्थित होते.
पंकजा यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातील हिंदीमध्ये शेरो शायरी करत वातावरण निर्मिती केली. यावेळी त्यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलन करणा-या लक्ष्मण हाके यांचा गोंडस लेकरू म्हणून उल्लेख केला. पंकजा यांनी हा उल्लेख करतातच उपस्थितांनी जोरजोरात घोषणा दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पंकजा यांनी परळीतून धनंजय मुंडेच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करत, त्या राज्यभरात प्रचारासाठी फिरणार असल्याचे सांगितले.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार बजरंग सोनवणे यांनी पराभूत केले होते. त्यानंतर बीड जिल्ह्यात काही पंकजा समर्थकांनी जीव दिल्याचे प्रकार समोर आले होते. त्यानंतर राज्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने पंकजा यांना उमेदवारी देत त्यांना विजयी केले होते. पंकजा यांना ही आमदारकी मिळाल्याने त्यांना ५ वर्षांनी सक्रिय राजकारणात परतण्याची संधी मिळाली आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यी युती झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले आहेत. गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडल्यानंतर धनंजय मुंडे पंकजा यांच्या मेळाव्याला जात नव्हेत. पण आज १२ वर्षांनी धनंजय मुंडे पंकजांच्या दसरा मेळाव्याला हजर होते.