धनंजय मुंडे विरोधात परळी न्यायालयात सुनावणी

परळी-धनंजय मुंडे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप करीत करुणा शर्मा यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

करुणा शर्मा यांनी ऑनलाईन तक्रारीत आरोप केला आहे की, धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात त्यांच्या नावावर असलेल्या मिळकतीचा उल्लेख केलेला नाही. यापूर्वीच्या सुनावणीवेळी नोटीस धनंजय मुंडे यांच्या पत्त्यावर न मिळाल्याने खटल्याची पुढील तारीख देण्यात आली होती.

तक्रारीनुसार, धनंजय मुंडे यांनी पत्नी राजश्री मुंडे आणि तीन मुलींच्या तपशीलाचा समावेश केला होता, तसेच करुणा शर्मा यांच्या दोन मुलांचा उल्लेख केला होता. मात्र, करुणा शर्मा आणि त्यांच्या नावावरील संपत्तीबाबत कोणतीही माहिती शपथपत्रात नमूद केली नव्हती. त्यामुळे ही तक्रार न्यायालयात पोहोचली आहे.

Protected Content