धनंजय चौधरी यांच्या कृतज्ञता यात्रेला सुरूवात

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महात्मा गांधी यांना त्यांचे राजकीय गुरु गोपळकृष्ण गोखले यांनी भारत समजून घ्यायचा असेल तर भारत भ्रमण करायला सांगितले होते तसेच माझे वडील राजकीय गुरु आहेत त्यांनी मतदारसंघ समजून घेण्यासाठी मतदारसंघातील समस्या, अडीअडचणी मला समजाव्यात यासाठी कृतज्ञता संवाद यात्रेची सुरूवात केली आहे. असे आपल्या मनोगतात युवा नेते धनंजय चौधरी यांनी सांगितले.

गावागावातून मिळणारा प्रतिसाद हा चौधरी कुटुंबावर असणारे नितांत प्रेम,विश्वास,आपुलकी यातून दिसत आहे. आपला सातपुडा, हिरवा शालू नेसलेल्या डोंगर रांगा आपली सांस्कृतिक ,सामाजिक जाणीव समृद्ध करतो त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी गावातील स्वर्गीय लोकांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण आपण करत आहोत. यातून आपल्या जवळच्या लोकांची आठवण सतत सोबत राहील असं आशावाद धनंजय चौधरी यांनी व्यक्त केला.

तिसऱ्या दिवशी ही कृतज्ञता संवाद यात्रा गुलाबवाडी,मोरवाल,जीन्सी आणि विश्रामजीन्सी सातपुड्याच्या कुशीत बसलेली ही गावे.आजही स्वर्गीय मधुकरराव चौधरी यांच्या पाऊल खुणांची आठवण देतात. सन १९७५ ला गुलाबवाडीला तीन वेळा आग लागली,घरे भस्मसात झाली,त्यावेळी स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेबांनी या गावासाठी त्यांना सागवान लाकूड घरावरील पत्रे,बांधकाम इत्यादींची व्यवस्था स्वतः करून दिली.वयस्कर माणसे आजही त्यांची आठवण काढतात.त्यांचा वारसा मा.आमदार शिरीष दादा यांनी या गावात रस्त्यावर गट्टू बसवून दिले त्याचप्रमाणे त्यांना पाण्याची समस्या सोडवून देण्यासाठी विहीर सुद्धा मंजूर केलेली आहे. धडाडीचे नेतृत्व धनंजय भाऊ चौधरी यांनी गुलाबवाडीला भेट देताना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या पुढील येणाऱ्या अडचणी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न मी करणार असे आश्वासन दिले. वरील गावांमधून रस्ते,वीज,सांडपाणी शासकीय स्तरावरील अडचणी बाबत प्रत्येक गावातील गावकऱ्यांची संवाद साधला,त्याचप्रमाणे गावांमधून फेरी मारून गटारी, सांडपाणी,वीज इत्यादींची माहिती घेतली. गावकऱ्यांशी मोकळेपणाने चर्चा करताना समाजात सौहार्द राहावा एकमेकांना साथ देऊन विकास करावा जातीपाती अपप्रचाराला बळी पडू नये.

समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे अशी भावना युवानेते धनंजयभाऊ यांनी व्यक्त केली.त्यांच्या उपस्थितीत गावातील पाणीपुरवठा योजना विहीर यांचे जलपूजन करण्यात आले. याप्रसंगी धनलाल पवार, मोतीराम वारके, जुम्मा तडवी, गुरुमुख पवार, दयाल सिंग, ताळजिंसी भगवान महाजन, विशाल महाजन,आला पवार, अय्युब तडवी,जुमा तडवी,यांच्या हस्ते करण्यात आले आदिवासी व डोंगराळ भागातील महिलांना सशक्तीकरणासाठी महिला बचत गटांना स्वयंरोजगार कसा मिळवता येईल याबाबत धनंजय दादांनी माहिती दिली त्यांच्यासाठी डॉक्टर नीलम पाटील अलका पाटील,विजय कोळी यांनी स्वयंरोजगाराबद्दल प्रशिक्षण दिले.धनंजयदादानी हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन मा.आमदार शिरीष दादा यांनी लोकार्पण केलेल्या समाज मंदिरात महिला बचत गट कार्कर्त्याचा मेळावा आयोजित केला होता यावेळी उपसरपंच. रेखाबाई पवार उपस्थित होत्या.गावातील पाणी फिल्टर,वीज,रस्त्याची समस्या शाम पवार यांनी मांडली. डीपी मंजूर असल्याची माहिती धनंजयभाऊ यांनी दिली.

तरुणांना आणि महिलांना मार्गदर्शन करतांना महिलांचे घराचे कामकाज व घरातील मुलांना सूसंस्कारित करून व्यसनापासून रोखावे असे आवाहन केले.त्याचप्रमाणे महिलांना स्वयम् रोजगार मिळवण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिलं या प्रसंगी वरील गावामधील गुरुमुख पवार, दयाल सिंह, हिरा पवार, उत्तम पवार, राजू पवार आदीच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले होते. वृक्षारोपण करताना छगन पवार,मागणं पवार,राजेंद्र पवार,उत्तम पवार,गोपाल पवार, अजमल पवार,अमर सिंग पवार, शिवजी पवार, काळू राठोड, लकीचंद राठोड हंसराज पवार ईश्वर पवार, करतार सिंग पवार, सरफराज तडवी, अलाउद्दीन तडवी, जुम्मा उस्ताद, इस्माईल तडवी, अकबर तडवी, साहेब तडवी, रज्जाक तडवी, उस्मान तडवी इत्यादींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. महिला बचत गटाच्या अध्यक्ष रिंकू तडवी, रुबीना तडवी, कविता तायडे, पूजा तायडे, पल्लवी तायडे ,बबीता तडवी उपस्थित होत्या.

Protected Content