यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगावच्या गावातील महादेव व हनुमान मंदिरात अधिक मासा निमित्ताने परिसरातील व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे पहायाला मिळाले.
दहिगाव येथील श्री क्षेत्र महादेव व हनुमान मंदिरात अधिक मासा निमित्ताने च नव्हे तर दैनंदिन भल्या पहाटे बालगोपालांपासून तर वयोवृद्धांपर्यंत महिला व पुरुष पाणी महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकण्यासाठी व पूजाच्या करण्यासाठी नियमित येत असून दहिगाव गावात सर्वत्र भक्तीचा व भावनिकतेचा ध्यास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.
पुरातन काळातील महादेव व हनुमान मंदिर येथे होते. त्यांचा कायापालट करून त्यांचे पुनर्वसन बाळकृष्ण लटकन पाटील, देविदास पाटील , सुरेश पाटील, प्रमोद चौधरी, हेमराज महाजन , दगडू महाजन, मिलिंद नेहते, लक्ष्मण चौधरी, अरुण अत्तरदे, रमेश पाटील ,नथू कोळी, रमेश महाजन ,मयूर पाटील, आकाश महाजन ,विश्वास पाटील यांचे सह गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेत देणगी स्वरूपात मिळालेले लाखो रुपये खर्च करीत सुन्दर अशा मंदिराची उभारणी करून महादेव व हनुमंताची प्राणप्रतिष्ठा २३ मार्च २३ रोजी केली.
या निमित्ताने परमपूज्य गुरुवर्य शास्त्री सरदारजी यांचे वाणीतून शिवपुराण सप्ताह पार पाडण्यात आला तेव्हापासून गावातील अबाल भाविकांना अध्यात्मिकतेचा ध्यास लागलेला आहे आता तर अधिक मासानिमित्ताने परिसरातील सावकारासिंग कोरफवली महेलखेडी येथील भाविकही महादेव दर्शनासाठी व आरतीचा लाभ घेण्यासाठी सोमवार आणि शनिवार सायंकाळी येत असतात, हजारो भाविक या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतात व देणगी सुद्धा देत आहेत. मंदिराच्या प्रगती साठी देणगी रूपाने मदतही करण्यास सुरुवात केलेली आहे.
गावात प्रति पंढरपूर मानले जाणारे श्री विठ्ठल रुक्माई मंदिर सन१९९८ मध्ये भाविक सुरेश पाटील यांचे माध्यमातून व त्यांचे सहकार्याच्या परिश्रमातून उभारण्यात आले आणि तेव्हापासून श्री विठ्ठल रुक्माई चा वर्धापन दिन आणि आषाढी एकादशी निमित्ताने यात्रोत्सव भरण्यास सुरुवात केलेली आहे. अशा या दहिगाव या गावातील अनेक तरुण हे व्यसनमुक्त होऊन त्यांच्या ह्ययात धार्मिकतेची भावना निर्माण होण्यास सुरुवातही झालेली आहे परिसरातील भाविकांनी श्रावण मासानिमित्ताने महादेवा च्या दर्शनाचा लाभ घ्यावा व आर्थिक उपस्थिती द्यावी, असे आवाहनही बाळकृष्ण पाटील यांनी केलेले आहे मंदिराचे कामकाज पाटील करीत असून पुजारी म्हणून हरिहर गोसावी आपले कर्तव्य पार पाडत आहे.