तरडे व गाढोदा येथील देवकरआप्पांचे प्रचार फलक फाडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या प्रचाराचे तरडे आणि गाढोदा येथील फलक फाडल्याचे उघडकीस आले असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुलाबराव देवकर यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोर तगडे आव्हान उभे केले आहे. येथे अतिशय चुरशीची निवडणूक होणार असल्याचे चिन्ह आहे. देवकर यांचे ठिकठिकाणी स्वागत होत असून जनता त्यांना लोकवर्गणी करून निवडणुकीसाठी मदत करत आहेत.
दरम्यान, हे सारे होत असतांना काल रात्री अज्ञात समाजकंटकांनी धरणगाव तालुक्यातल तरडे आणि जळगाव तालुक्यातील गाढोदा येथील गुलाबराव देवकर यांचे प्रचार फलक तोडून टाकण्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या पायाखालील वाळू घसरल्यामुळे आता ते अशा प्रकारे रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप करत जनताच याला उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Protected Content