यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभे च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा सह महायुतीच्या प्रमुख घटक पक्षांच्या उमेदवारांना दणदणीत असे विजय मिळवण्यात महत्वाची भुमिका बजावणारे आधुनिक महाराष्टाचे नेते तथा आमचे मार्गदर्शक मा.ना.देवेंद्र फडणवीस यांची एकमताने भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल यावल येथे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यावतीने घोषणाबाजी करून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र बलशाली होईल आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास आहे. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या ठीकाणी जल्लोषात सहभाग घेवुन व्यक्त केला.
यावल शहरातील प्रमुख मार्गावरील भुसावळ टी पॉईंट या चौकात भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे, माजी नगरसेवक तथा भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीचे जळगाव जिल्हा सरचिटणीस डॉ. कुंदन फेगडे, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश फेगडे, भारतीय जनता पक्षाचे यावल शहराध्यक्ष राहुल बारी, सागर महाजन, पंकज चौधरी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक नारायण चौधरी, कृउबाचे संचालक उमेश पाटील, योगराज बऱ्हाठे, बबलू घारू, यावल शेतकी संघ संचालक हेमराज फेगडे, जेष्ठ कार्यकर्ते पि.एस सोनवणे, दिनेश पाटील सौखेडा, मुकेश कोळी, विशाल शिर्के, पुंडलिक बारी, भुषण फेगडे, बबलू येवले, कोमल इंगळे, उज्वल कानडे,मनोज बारी यांच्यासह या प्रसंगी मोठया संख्येत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.