मुंबई प्रतिनिधी । राज्य विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज निवड करण्यात आली आहे.
विलक्षण नाट्यमय घटना घडल्यानंतर आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या उध्दव ठाकरे हे शानदार कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. तर महाविकास आघाडीत मंत्रीपद वाटपावरून चर्चा सुरू आहे. एकीकडे या घटना घडत असतांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे आता विधानसभेत उध्दव ठाकरे यांच्या विरूध्द फडणवीस असा सामना रंगणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.