मुंबई प्रतिनिधी |मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विमानाने प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार असून हे अधिवेशन फक्त पाच दिवसांचं होणार आहे यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
पाच दिवसांच्या अधिवेशनात पुरवणी मागण्यावर एक दिवस चर्चा होणार आहे. चर्चेनंतर पुरवणी मागण्या पास करण्याचा निर्णय घेतलाय मात्र हे अधिवेशन अजून वाढवलं पाहिजे असं विरोधकांच म्हणणे आहे.

कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन न घेण्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उचलत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.


