सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी बांधव हे कायम शिक्षित, प्रगत व्हावे त्यांनी मुख्य प्रवाहात यावे यासाठी अनेक वर्षांपासून चौधरी परिवाराने कार्य केले आहे. आदरणीय बाळासाहेब चौधरी यांनी हेच उद्दिष्ट ठेवले. यामुळे आदिवासी बांधवांमध्ये अनेक तरुण हे शिक्षित झाले परदेशात गेले, अधिकारी झाले त्याकाळी त्यांनि हा विचार रुजवला आणि आम्ही पुढे देखील हाच विकासात्मक विचारांचे धोरण आजतागायत अवलंबिले आहे. यापुढे आमचा परिवार याच विचारांनी कार्य करेल अशी ग्वाही आमदार शिरीष चौधरी यांनी आदीवासी मेळाव्यात संबोधताना दिली. रविवारी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाल येथे आदिवासी समाजाचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी व प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हा मेळावा घेण्यात आला.
लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी आदिवासी बांधवाना विकास व्हावा या दृष्टीकोनातून शिक्षणाची गंगा आदिवासी भागात आणली त्यामुळेच अनेक आदिवासी बांधव कोणी शिक्षक,डॉक्टर अधिकारी झालेत तेच परंपरा कायम ठेवत आमदार शिरीषदादा चौधरी यांनी अनेक विकासात्मक कामे केली विरोधी पक्षात असून सुद्धा गावाला जोडणारे रस्ते गावांअंतर्गत आवश्यक असणारी विविध कामे आदिवासी भागात केली. विरोधी पक्षात काम करताना देखील आपल्या मतदार संघासाठी आपण कायम प्रयत्नशील राहावे हाच उद्देश डोळ्यासमोर आम्ही ठेवला.
आदिवासी बांधव नेहमी आमच्या परिवारावर प्रेम करत आलेले आहेत असे मत चौधरी यांनी व्यक्त केले. तसेच आमची कायम साथ आणि आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहील अशी ग्वाही आदिवासी बांधवांनी या मेळाव्यात दिली. रावेर विधानसभा मतदारसंघाच्या विकासात आदिवासी बांधवांची भूमिका महत्त्वाची असून या निवडणुकीत भव्य विजय संपादन करण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने काम करू असे देखील आश्वासित केले. यावेळी सोबत जळगाव जिल्हाचे प्रभारी जम्मू काश्मीरचे आमदार गुलाम रझा,काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षा मा.प्रतिभाताई शिंदे हाजी मा हमीद भायखा तडवी मा.मासुम रहेमान तडवी,श्री गोंडू रामदास महाजन अहमद बुरान तडवी,आदिवासी सेल काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जमादार, हाजी बशीर परमार श्री रतन बारेला, रफिक मौलाना, उस्मान महेबूब तडवी,युनूस इस्माईल तडवी कामिलशेठ तडवी जहाबिर तडवी ,सलीम तडवी उपसरपंच राजू तडवी, रशीद तडवी, अल्लाउद्दीन तडवी, गफूर भाई रसलपुर, शेख सकल नशीर, हबीब पठाण चिचाटी, सुलेमान तडवी सहस्रलिंग, शाबू तडवी सहस्रलिंग, कमाल हाजी कान्हा परसाळे, मसूद तडवी जानोरी, दिलावर खा गुलाब खा, शहादुर सलाबत, लतीफ रसूल तडवी सावखेडा, अभेराम मैनाब, सुपडूदादा तडवी तिड्या, शिकारी गोपाळ चारमळी, इमान नामदार तडवी, सलमान शत्रू, इस्माईल, सरफराज सरदार, नुरा तडवी मोहगण, सरपंच लियाकत जमादार ,उपसरपंच मज्जीद तडवी उमर रमजान, सलीम तडवी पाल, गणेश मेंबर, सुपडू महबू तडवी कठोरा, अरमान सरपंच लालमाती, मेहरबानी युसुफ,रहमान गुलशर तडवी व अन्य मान्यवर उपस्थित होते.