चोपडा, प्रतिनिधी | तालुक्यातील विकास कामांचा चोपड्याचे आ. लता सोनवणे यांच्या हस्ते बस स्थानकाचे नूतनीकरण व आधुनिकीकरणाच्या विस्ताराचे सुमारे २ कोटी १ लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
आ. लता सोनवणे यांनी तालुक्यातील जनतेने विश्वास दाखवत निवडून आणले. त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता तालुक्यात विकास हेच ध्येय ठेवत काम मार्गी लागतील असे आश्वासन दिले. यावेळी माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे, भाजपा केंद्रीय समिती सदस्य घनश्याम अग्रवाल, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, तालुका संगटक सुकलाल कोळी, शहर प्रमुख आबा देशमुख, नरेश महाजन, जेष्ठ शिवसैनिक दिपकसिंग जोहरी, विधानसभा क्षेत्रप्रमुख विकास पाटील, जि.प सदस्य हरिष पाटील, पं.स उपसभापती एम.व्ही.पाटील, प.स.सदस्य भरत बाविस्कर, डॉ.श्रीधर साळूंखे, प्रभाकर सोनवणे, ऍड. वसंत भोलाणेकर, नगरसेवक किशोर चौधरी, प्रकाश राजपुत, महेंद्र धनगर, राजाराम पाटील, नगरसेविका लता पाटील, मिना शिरसाठ, मनिषा जैस्वाल, संध्याताई महाजन, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रोहिणी पाटील, तालुका प्रमुख मंगला पाटील, शहर प्रमुख रेखा मराठे, दीपाली माळी, माजी उपसभापती माणिकचंद महाजन, युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक चौधरी, तालुका प्रमुख गोपाल चौधरी, प्रदीप बारी, डॉ.रोहन पाटील, नंदु गवळी, दिव्याक सावंत, ऍड. शिवराज पाटील, राजू जयस्वाल, सुनिल बरडीया, मगन बाविस्कर, पी.आर.माळी, डेपो मॅनेजर संदीप क्षीरसागर, शाखा अभियंता निलेश पाटील, कामगार सेनेचे आर.के.पाटील, धनराज देवराज, शाम धामोळ, एम. एल. बाविस्कर, संजय लोहार, कामगार संघटनेचे पंडित बाविस्कर यासह शिवसैनिक युवा सैनिक, प्रवासी,एसटी महामंडळ कर्मचारी उपस्थित होते.