भुसावळ(प्रतिनिधी) आरक्षित डब्यात ई-तिकिट वेटिंगवरुन वाद झाल्यानंतर एका प्रवाशाने टी.सी.ला मारहाण केल्याची घटना कसारा ते आसनगाव दरम्यान गुरुवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे टीसी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
वारंवार होणाऱ्या अशा घटनांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. वेटिंग ई तिकीटावरुन वाद झाल्याने कसारा ते आसनगावदरम्यान प्रवासी जयप्रकाश केसरी यांनी टी.टी.आय. सी.व्ही. शेळके यांना काल (दि. २३) मारहाण केली होती. याबाबत शेळके यांनी येथील रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली आहे.