जळगाव प्रतिनिधी । येथील जळगाव पीपल्स बँकेच्या रिंग रोड शाखेत २००६ पासून खाते असलेल्या खातेदाराच्या लॉकर मध्ये दोन देशी बनावटीचे पिस्तूल व काडतुस आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून ४८ जिवंत काडतुसे ताब्यात घेतले आहे
याबाबत माहिती अशी की, इंडिया गॅरेज परिसरातील रहिवासी मिर्झा लतीफ शेख यांचे २००६ पासून रिंग रोडच्या जळगाव पीपल्स बँकत आहे या खात्याच्या नावे याच बँकेत त्यांचे स्वतंत्र लॉकर आहे. त्याचा त्यांनी अद्याप पर्यंत दोन वेळा वापर केला त्यानंतर वापर न झाल्याने आरबीआयच्या नियमानुसार त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्याला उत्तर न दिल्याने बँकेच्या अधिकार्यांचा कर्मचारी यांनीच ७मे रोजी तपास केला असता त्यांना लॉकरमध्ये दोन देशी बनावटीची पिस्तुल आणि काडतूस आढळून आले आहेत. याबाबत त्यांनी त्यांनी जिल्हापेठ पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर जिल्हापेठ पोलिस कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली लॉकरमधील दोन पिस्तुले आणि ४८ काडतुसे जप्त केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.