वडगाव येथील विदयालयात महीलादिनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार

Bhadgaon

भडगाव (प्रतिनिधी) । तालुक्यातील वङगाव बु येथील प्रताप माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस.के. राठी होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी उपजिल्हाधिकारी प्रियंका पाटील व त्यांचे वडील शांताराम पाटील होळ हे हजर होते. तसेच पंचायत समिती भडगाव येथुन निबा परदेशी व विकास माळी हे उपस्थित होते.

याप्रसंगी प्रियंका पाटील यांनी महिला दिवसाची माहिती व स्वतःच्या जीवनाचे अनुभव व्यक्त केले. डिजिटल वर्गांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विदयालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आदि उपस्थित होते.

 

Add Comment

Protected Content